Headlines

धन्वंतरी रुग्णालयात 40 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक:15 जागांचे निकाल जाहीर, 6 उमेदवार बिनविरोध विजयी

गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अमरावती येथील धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेची (दसरा मैदानजवळ, बडनेरा रोड) निवडणूक पार पडली. सोमवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. १७ मे रोजी झालेल्या मतदानात ३ हजार १७१ मतदारांपैकी १ हजार ३३८ (४२.१९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कॅम्प परिसरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला…

Read More

अपर आयुक्त राजेश खवले यांचा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कानमंत्र:यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजनाचे महत्त्व सांगितले

नागपूरचे अपर आयुक्त राजेश खवले यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खचून न जाता सातत्याने परिश्रमपूर्वक नियोजनबद्ध रीतीने योग्य अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येते, असा कानमंत्र त्यांनी दिला. खवले यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन केला. ग्रामीण भागातून येऊन कापडाच्या दुकानात काम करत असताना, माहुली जहागीर ते अमरावती असे दररोज…

Read More

भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील:सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही, मे महिन्यात दररोज 23 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले

अमेरिकेकडून मिळणारी निर्बंधांची सूट संपल्यानंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, रशियाकडून कच्च्या तेलाची (क्रूड ऑइल) खरेदी पुढेही सुरूच राहील. अमेरिकेच्या निर्बंधांची सूट संपल्याने भारताच्या आयात योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारताचा हा निर्णय कोणत्याही देशाच्या सवलतीवर आधारित नसून…

Read More

काँग्रेसचे दर्यापूर तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांचा राजीनामा:खासदार वानखडे आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त

दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अलिकडेच झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीपासूनच दर्यापूर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी सुरू होत्या. भारसाकळे यांनी खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी जिल्हा…

Read More

CM सुवेंदू पीए हत्याकांड- यूपीतून आणखी एक आरोपी पकडला गेला:कुटुंबासोबत हरिद्वारहून परत येत होता, हा देखील बलियाचाच रहिवासी

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी सोमवारी यूपीमधून आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली. बलिया येथील राजकुमार सिंह याला सीबीआयने मुझफ्फरनगर येथून पकडले. यापूर्वी 10 मे रोजी बलिया येथील राज सिंह याला अयोध्येतून पकडण्यात आले होते. बंगाल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 2 दिवसांनी, 6 मे रोजी 42 वर्षीय चंद्रनाथ रथ यांची गोळ्या…

Read More

इर्विनमधील परिचारिकांचा संप तासाभरात स्थगित:पीडित परिचारिकेला न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) परिचारिकांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. जीएमसीमधील एका पीडित परिचारिकेला न्याय मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, तासाभरातच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला इर्विन रुग्णालयासह डफरीन…

Read More

Daund SRPF Exam Cancelled; 85 Questions Leaked from Coaching Class

राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. गेल्या २ मे रोजी झालेल्या या परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातातून जसेच् . एसआरपीएफ-5 या गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा २ मे शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयात…

Read More

Bhopal Actress Twisha Sharma Death CCTV Footage

फराज शेख। भोपाळ7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भोपाळमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा (31) च्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सोमवारी CCTV फुटेज समोर आले आहे. मृत्यूपूर्वी ती घराच्या छतावर जाताना दिसली आहे. थोड्या वेळाने तिचा मृतदेह तीन लोक खाली आणताना दिसत आहेत. ट्विशाची व्हॉट्सॲप चॅटही व्हायरल झाली आहे. यात तिने लिहिले आहे, “मला खूप गुदमरल्यासारखं होत आहे…

Read More

कांदा उत्पादकांना ₹2000 दर द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन:सासवडमध्ये काँग्रेसचा एल्गार; केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत, कांदा उत्पादकांना किमान २००० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे. पुरंदर तालुका काँग्रेस आणि पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सासवड येथील…

Read More

विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे….

Read More