Headlines

आर्मी चीफ म्हणाले- भारत ऑपरेशन सिंदूर 2.0च्या तयारीत:तिन्ही सेना पुढील युद्धासाठी 24 तास तयारी करत आहेत, सध्या फक्त युद्धविराम

सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. सध्या केवळ युद्धविरामासारखी स्थिती आहे. गरज पडल्यास तिन्ही सेना ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी पूर्णपणे सज्ज आहेत. आर्मी चीफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने एक बेंचमार्क सेट केला आहे की भारत चिथावणीला कसे प्रत्युत्तर देतो. कॅडेट्सनी आपल्या लष्करी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच हे कायम ठेवावे. आर्मी चीफ…

Read More

या आठवड्यात सोने-चांदीमध्ये घसरण:चांदीची किंमत ₹2650 ने कमी होऊन ₹2.66 लाख प्रति किलोवर, सोने ₹1654 ने स्वस्त झाले

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,654 रुपयांनी घसरून 1.56 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 23 मे रोजी 1.58 लाख रुपयांवर होता. तर, चांदी 2.66 लाख रुपये प्रति किलोवरून घसरून 2.63 लाख रुपयांवर आली आहे. म्हणजेच, तिची किंमत…

Read More

विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?:रोहित पवारांचा सवाल; पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामागे कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:ठाकरे गटाकडून बबनराव थोरातांसह डॉ. विवेक नावंदर इच्छुक, मतदारसंख्या कमी असूनही उबाठा मैदानात

परभणी –हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मुंबई येथे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये थेट लढत होणार…

Read More

जमीन खरेदी-विक्री व्यावसायिकाला मागितली 1 लाखांची लाच:ग्राम महसूल अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जमीन सपाटीकरण आणि विहीर खोदकामाच्या परवानगीसाठी ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाईपलाईनची…

Read More

पुणे विमानतळावर विमानात बॉम्ब धमकीची चिठ्ठी:गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात सापडली, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विमानतळावरील अधिकारी विशालकुमार श्रीवास्तव (वय 30) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी…

Read More

Shahu Maharaj Backs Jarange Patil; Govt Faces Warning

काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सर्व मराठे हे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हे मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे. पण सरकार मर . मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत भर उन्हात उपोषण सुरू…

Read More

पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी 40 आमदार का गेले ते बघा:उबाठाने विधान परिषदेची निवडणूक लाहोर-रावळपिंडीत लढवावी- नवनाथ बन

पार्थ पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी लक्ष्यात घ्यावे की आदित्य ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून तुमच्या पक्षातील 40 आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे, मातोश्रीचे दारं आमदारांसाठी कशी बंद होती हे सर्वांना माहिती आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकांनी तुमची साथ सोडली तुम्ही तुमच्या पक्षाकडे बघा…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया:मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका केली स्पष्ट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कडक उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील…

Read More

सुप्रीम कोर्टाने म्हटले- शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे अनिवार्य:31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ, म्हटले-अपात्र शिक्षक राहिले तर त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होईल

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की, शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. न्यायालयाने TET उत्तीर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 वरून वाढवून 31 ऑगस्ट 2028 केली. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. न्यायालयाने म्हटले की, TET पात्रता नसलेले शिक्षक सेवेत कायम राहिल्यास त्याचा…

Read More