![]()
लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जमीन सपाटीकरण आणि विहीर खोदकामाच्या परवानगीसाठी ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाईपलाईनची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी ग्राम महसूल अधिकारी अक्षय कोल्हे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे मान्य झाल्यावर, तक्रारदाराने गेल्या महिन्यात 2 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, कोल्हे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत. डोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात सहाव्या मजल्यावरुन सिमेंटची वीट डोक्यात पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट भागातील मुकुंदननगर परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम ठेकेदार, तसेच अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद बेंदू साहू (वय 27, रा. गणपती चैाक, लोहगाव, मूळ रा. नरी, छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत साहू याची पत्नी सविता हिने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम ठेकेदा, तसेच अभियंत्याविरुद्ध (साईट इंजिनिअर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
जमीन खरेदी-विक्री व्यावसायिकाला मागितली 1 लाखांची लाच:ग्राम महसूल अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल