![]()
नेपाळमध्ये आलेल्या मोठ्या पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या परिस्थितीत नेपाळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सरहद’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. नेपाळमधील परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी आणि आपत्तीमुळे नेमके किती व कोणत्या स्वरूपाचे नुकसान झाले आहे, याचा अभ्यास करण्यासाठी सरहदचे एक शिष्टमंडळ लवकरच नेपाळला भेट देणार आहे. या दौऱ्यामध्ये शिष्टमंडळ पूरग्रस्त भागांना भेट देईल. तसेच, स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिक आणि आपत्तीग्रस्तांशी संवाद साधणार आहे. या अभ्यासातून नेपाळमध्ये सध्या सर्वाधिक कशाची गरज आहे, कोणत्या स्वरूपाचे दीर्घकाळ टिकणारे आणि प्रभावी काम करता येईल, तसेच मदतकार्याची दिशा आणि प्राधान्यक्रम ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. फक्त तात्पुरती मदत न देता, स्थानिक गरजांचा अभ्यास करून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, मूलभूत सुविधा, बालकल्याण आणि उपजीविका पुनर्स्थापना यांसारख्या क्षेत्रांमध्ये गरजेनुसार काम करण्याची शक्यता सरहद तपासणार आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीला संजीव शहा, दिलीपसिंह विश्वकर्मा, डॉ. शैलेश पगारिया, विवेक राऊत, संजय नहार, चंद्रकांत घाणेकर, राजेंद्र नवले आणि लेशपाल जवळगे उपस्थित होते. भारत-भारती, पुणेतर्फे आयोजित रक्षाबंधन साजरे भारत-भारती, पुणेतर्फे आयोजित रक्षाबंधन आणि ‘विविध भाषा-भगिनीं’च्या महाभजन संध्येने ‘विविधतेत एकता’ हा केवळ शब्द नसून तो भारताचा आत्मा आहे, याची प्रचिती अनुभवायला मिळाली. दिव्यांगांच्या हातून बांधण्यात आलेले प्रेमाचे रेशीमबंध आणि देशाच्या विविध प्रांतांतील भगिनींनी त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत सादर केलेली भजने याद्वारे संपूर्ण भारत एकाच छताखाली अवतरल्याचा अभूतपूर्व अनुभव उपस्थितांनी घेतला. सहकार नगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर सभागृहात या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, पंजाब प्रांतासह नेपाळमधून आलेल्या भगिनींनी आपापल्या बोलीभाषेत भजने सादर केली तेव्हा प्रांतांच्या अन् भाषांच्या सीमा गळून पडल्या; उरला तो फक्त भारतीयत्वाचा भाव! भजन, संस्कृती, रक्षासूत्र आणि स्नेहमिलनाच्या या संगमाने संपूर्ण वातावरण भावपूर्ण व देशभक्तीच्या रंगात रंगवून गेले. काश्मिरी भगिनींनी मातृभाषेत सादर केलेल्या भजनाने प्रथम क्रमांक पटकाविला तर केरळी भाषेतील भजनाला द्वितीय आणि गुजराती भाषेतील भजनाच्या सादरीकरणाला तृतीय क्रमांक मिळाला.
Source link
नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरहदचा पुढाकार:नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ नेपाळमध्ये जाणार