Headlines

पुणे महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर!:महसूल वाढीसह विकासकामांना गती देण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे निर्देश

महापौर मंजुषा नागपुरे यांनी महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत महसूल वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला, ज्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रशासकीय आढावा बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित…

Read More

AIADMK मध्ये फूट, बंडखोर गटाचा TVKला पाठिंबा:षण्मुगम म्हणाले- जनादेश विजयसोबत, आम्ही DMK मध्ये सामील झालो असतो तर संपलो असतो

तामिळनाडूमध्ये AIADMK पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. पक्षाचे नेते सी.व्ही. षणमुगम यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळगम’ (TVK) या पक्षाला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत ३० आमदारांनीही विजय यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी सकाळी षणमुगम यांनी निवेदन दिले, ‘आम्ही जनतेचा जनादेश स्वीकारतो. हा जनादेश TVK साठी…

Read More

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का?:पेट्रोल दरवाढीची ही पूर्वतयारी तर नाही ना? राज ठाकरेंनी पत्रातून पंतप्रधानांना दाखवला आरसा

देशातील वाढती महागाई, इराण-इस्रायल युद्धामुळे वाढलेले कच्च्या तेलाचे भाव आणि ढासळती अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहित आरसा दाखवला आहे. “चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?” असा जळजळीत सवाल करत राज ठाकरेंनी या पत्राद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर…

Read More

मोदींच्या घोषणांवर शरद पवारांची चिंता व्यक्त:मध्यपूर्वेतील तणावावर मोदी सरकारला इशारा; सर्वपक्षीय बैठकीची मागणी

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी…

Read More

सोलापूर शहराचा 40 टक्के भाग B1, B2, गुंठेवारीत:दंडाच्या अवाढव्य रकमेने नागरिक जेरीस, बेकायदेशीर व्यवहार वाढले

सोलापूर शहरातील कर्णिक नगर, एकता नगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, मुरारजी पेठ, जुनी मिल चाळ, विकास नगर, कुमठा नाका, रेल्वे लाईन्ससह 25 ते 40 टक्के भाग ‘बी-1′,“बी-2′, ‘एच’ आणि ‘जी’ अशा शासनाच्या विविध किचकट सत्ताप्रकारांमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे संबंधित मिळकतदारांना हक्काच्या जागेचा विकासच करता येत नाही. परिणामी बेकायदेशीर व्यवहारांमध्ये वाढ झाली. एखाद्या इमारतीचे सात ते आठ…

Read More

हळदीच्या शेतातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा 10 किमी अंतरावर सापडला मृतदेह:गुरुवारी होणार होता विवाह, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घटना

सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील भावी नवरदेवाचा मृतदेह 10 किलो मिटर अंतरावर असलेल्या आडगाव शिवारातील एका विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वायचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतदेहावर सोमवारी ता. 11 रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी…

Read More

Baramati Pawar Family Succession Politics; Third Generation Gears Up for 2029 Election

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत राजकीय चर्चांना मोठी चालना मिळाली आहे. पवार कुटुंबातील पुढचा राजकीय वारसदार कोण, याबाबत आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे पवार घराण् . एकीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील काही सदस्य सार्वजनिकरित्या पवार विरुद्ध पवार, होणार नसल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मतदारसंघात सुरू…

Read More

घाटीत परिचारिकांची 5 हजार पदे रिक्त:लेबर रूम, एनआयसीयूमध्ये रुग्णसेवेची अग्निपरीक्षा, वरिष्ठ पदे, मेट्रन, अधिसेविकांच्या जागांवरही भरती नाहीच

एकीकडे राज्य शासन नवनवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे या व्यवस्थेचा कणा असलेल्या परिचारिकांच्या रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या राज्यात परिचारिका संवर्गातील 8 हजार पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वाधिक 5 हजार पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र नर्सिंग…

Read More

राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग:विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणुका; पावसाळी अधिवेशनाआधी मोठी घडामोड

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेतील सदस्यसंख्येवर त्याचा परिणाम झाला होता….

Read More

संभाजीनगरात पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या:सासुरवाडीतच संपवले जीवन, पत्नी- प्रियकरासह चौघांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरात पत्नीचे अनैतिक संबंध, प्रियकराच्या धमक्या आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून 35 वर्षांच्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथे घडली. कृष्णा अण्णासाहेब गरड ( 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. 22 एप्रिल रोजी त्याने विष प्राशन केले होते. घाटी रुग्णालयात 15 दिवस चाललेल्या उपचारादरम्यान…

Read More