भाजप पुरस्कृत पॅनेलच्या पराभवानंतर MMCची निवडणूक रद्द:विरोधकांकडून सरकारवर टीका, म्हणाले – हे प्रशासन नसून हुकूमशाही
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (MMC) निवडणुकीत सत्ताधारी भाजप समर्थित पॅनेलला मोठा धक्का बसल्यानंतर, राज्य सरकारने ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे कौन्सिलवर सदस्यांची निवड ही निवडणुकीद्वारे न होता थेट सरकारच्या ‘नामनिर्देशन’ पद्धतीने होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकशाहीचा खून होत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसाठी एप्रिल २०२६…