मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम
पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत. आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी…