Headlines

निदा खानला MIM च्या नगरसेवकाने लपवले:पोलिसांची मतीन पटेल यांना नोटीस, मोबाईलही जप्त; 2 महिन्यांपूर्वीच खरेदी केला होता फ्लॅट




नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका नगरसेवकाने लपवून ठेवले होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर नगरसेवकाला नोटीस बजावून त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मूळे आणखी खोलवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलिस निदा खानच्या शोधात होते. ती गत 25 मार्चपासून फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. पण ती वारंवार आपले लोकेशन बदलत होती. तिचे जवळचे नातेवाईक तिला लपण्यासाठी मदत करत होते. याच काळात ती अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न सुरू केला होता. पण कोर्टाने तिला कोणताही दिलासा देण्यास साफ नकार दिला होता. अखेर ती छत्रपती संभाजीनगर येथील एका घरात लपून बसल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगवान कारवाई करत तिला बेड्या ठोकल्या. मतीन पटेल यांनी खरेदी केले नवे घर निदा खानला बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी तिला आश्रय देणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. त्यात एमआयएमचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला लपण्यासाठी मदत केल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मतीन पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा मोबाईल जप्त केला आहे. विशेष म्हणजे निदा खान गत 5 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये राहत होती. ती संपर्कात आल्यानंतर मतीन पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवे घर विकत घेतले होते. या घरात त्यांनी दिला ठेवले होते. पोलिसांना या गोष्टीची कुणकुण लागताच नाशिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या एका संयुक्त पथकाने सलग 2 दिवस या घरावर पाळत ठेवली होती. तांत्रिक तपासात या घरात निदा खान असल्याची खात्री पटताच त्यांनी गुरुवारी रात्री या घरावर छापा टाकून निदा खानला अटक केली. तिच्या अटकेमुळे आता नाशिक धर्मांतर व लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. निदा खानवर काय आहेत आरोप? निदा खान ही टीसीएस कंपनीत काम करत होती. तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव, मानसिक आणि लैंगिक छळ यांसारख्या अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच एका पीडित महिलेचे नाव बदलून तिला नोकरीच्या बहाण्याने मलेशियाला पाठवण्याचा कट रचल्याचाही आरोप तिच्यावर आहे. निदा खानविरुद्ध आतापर्यंत सुमारे 40 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात धर्मांतरासाठी होणारा फंडिंग नेमका कुठून येत होता आणि मालेगाव तसेच मलेशियातील रॅकेटशी तिचे काय संबंध आहेत? याचा उलगडा होण्याची शक्यता विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी व्यक्त केली. याच प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. निदा खानच्या अटकेनंतर आता या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा समावेश आहे, हे स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *