Headlines

'जेलर 2' ची पहिल्याच दिवशी ₹125 कोटींची कमाई:वर्ल्डवाइड ओपनिंगमध्ये 'ॲनिमल'चा विक्रम मोडला; परदेशात 'धुरंधर 2'ला टाकले मागे




दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ॲक्शन-ड्रामा चित्रपट ‘जेलर 2’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भारतात 59.70 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने देशभरातील 16,599 शोमधून 70.25 कोटींची देशात, तर परदेशात 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची पहिल्या दिवसाची जगभरातील कमाई 125.25 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘धुरंधर 2’ आणि ‘ॲॅनिमल’ला टाकले मागे परदेशातील कमाईच्या बाबतीत ‘जेलर 2’ने यावर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’चा विक्रम मोडला आहे. ‘धुरंधर 2’ने पहिल्या दिवशी परदेशात 52 कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती, तर ‘जेलर 2’ने 55 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. 125.25 कोटी रुपयांच्या एकूण वर्ल्डवाइड कलेक्शनसह या चित्रपटाने रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ (116 कोटी रुपये वर्ल्डवाइड ओपनिंग) या चित्रपटाचा विक्रमही मागे टाकला आहे. चित्रपटाला पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये सुमारे 37.46 लाख (3,746,734) प्रेक्षक मिळाले. तमिळमधून मिळाले 43 कोटी, हिंदीत कमावले 3.50 कोटी चित्रपटाच्या चार भाषांमधील आकडेवारीवर नजर टाकली तर तमिळ व्हर्जनचा दबदबा सर्वाधिक राहिला. तमिळमध्ये चित्रपटाने 9,326 शोमधून 43.35 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले, तर एकूण ऑक्युपन्सी 70.8% नोंदवली गेली. तेलुगू आवृत्तीने २,७९२ शोमधून १२.५० कोटी रुपयांची कमाई केली. तर, हिंदी आवृत्तीने ४,३७१ शोमधून ३.५० कोटी रुपये आणि कन्नड आवृत्तीने ११० शोमधून ३५ लाख रुपयांची निव्वळ कमाई केली. या चारही भाषांची भारतातील एकूण निव्वळ कमाई ५९.७० कोटी रुपये राहिली. निवृत्त जेलर ‘टायगर मुथुवेल पांडियन’ची कथा नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘जेलर २’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसत आहेत. कथेत अंडरवर्ल्डकडून नवे आव्हान उभे राहिल्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबाचे आणि वारशाचे रक्षण करण्यासाठी पुन्हा जुनाच हिंसक मार्ग स्वीकारावा लागतो. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात रजनीकांतसोबत मोहनलाल आणि विद्या बालन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *