ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात:राजकीय चर्चा, ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पल्लवी पाटील यांचा नुकताच अपघात झाला असून त्या सध्या उपचार घेत आहेत. ही माहिती मिळताच शिंदे यांनी मंगळवारी थेट मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालय गाठत त्यांची भेट घेतली….