Headlines

'गिरा तो भी मेरी टांग उपर':गिरीश महाजन यांचा संजय राऊतांना खोचक टोला, विरोधकांवरही डागली टीकेची तोफ

भाजपचे संकटमोचक आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर, विशेषतः संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या परिश्रमाचा दाखला दिला. यावेळी महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, राऊतांची अवस्था ‘गिरा तो भी मेरी टांग उपर’ अशी…

Read More

एसटी बस – स्कॉर्पिओची समोरासमोर धडक:4 जण जागीच ठार, 4 जखमी; मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे येथील घटना

एसटी बस आणि स्कॉर्पिओच्या समोरासमोर झालेल्या एका धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणावर घडली आहे. या घटनेत इतर 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगारातील एक बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या…

Read More

गडचिरोलीत 'नीट' परीक्षेत हायटेक कॉपी:AI च्या मदतीने उत्तरे शोधणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा, शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावरील प्रकार

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात हायटेक कॉपीचे रॅकेट उघड झाले आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत मोबाईल पोलिस एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर सोडवणाऱ्या एका विद्यार्थिनीला पोलिस एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पकडण्यात आले आहे. याप्रप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत….

Read More

नवरी एक, नवरदेव अनेक:आठ लग्नांनंतर नवव्या वेळी पर्दाफाश; लाखो लुटणाऱ्या बनावट नवरीला बेड्या, बोगस टोळीचा भंडाफोड

बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस विवाह लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका तरुणीने आधीच अनेक वेळा लग्न करून नवऱ्या मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, आठ लग्नं करूनही ही फसवणूक सुरूच ठेवत नवव्या लग्नावेळी तिचे बिंग फुटले आणि अखेर पोलिसांनी नवरीसह एजंटाला अटक…

Read More

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा:वकील असीम सरोदे यांची मागणी; 'नसरापूर'च्या आरोपीला हालहाल करून मारण्याच्या मागणीवर आक्षेप

वकील असीम सरोदे यांनी नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करून मारण्याची मागणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोपीला ठेचून मारा, हालहाल करून मारा, अशा मागण्या करणे म्हणजे समाजात बेकायदेशीरता पसरवण्याचा प्रयत्न आहे. त्यातून लोकांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे पोलिसांनी एकतर संबंधितांना समज द्यावी किंवा त्यांच्यावर गुन्हा…

Read More

साधना सप्ताहातील उल्लेखनीय कामगिरी:हिंगोलीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा शुक्रवारी मुंबईत होणार गौरव

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना पुरस्कार जाहिर झाला असून शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने मिशन…

Read More

दहशतवादाशी लढताना पोलिसांचे बलिदाने जास्त:तरीही आम्हीच उपेक्षित, टीकेचे धनी ठरतो पण देशासाठी प्राणही देतो!- आयजी सुनील फुलारी

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस दलाची व्यथा मांडली आहे. दहशतवादाचा मुकाबला करताना देशातील पोलिस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, असे ते म्हणाले. तरीही पोलिस दल उपेक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 75 वर्षांतील आकडेवारीनुसार, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांमध्ये सशस्त्र दलांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. असे असूनही,…

Read More

Sanjay Shirsats Operation Tiger Statement

येत्या काही महिन्यांत शिवसेना (शिंदे गट) पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीपूर्वी आपल्या मंत्रिमंडळाची ‘भाकरी’ फिरवण्याच्या तयारीत असून, जे मंत्री पक्ष संघटना बळकट करण्यात अपयशी ठरले आह . राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. शिरसाट म्हणाले…

Read More

भोंदूबाबाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पालघर जिल्ह्यातील संतापजनक घटना; भोंदू नराधमांना कायद्याचा धाक नाही – रोहित पवार

पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्यात भोंदू नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू…

Read More

पुणे पेट्रोल पंपावर सायबर फसवणूक:व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा, कमिशनसाठी बँक खात्यांचा वापर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमिशनच्या आमिषाने सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्याची परवानगी दिल्याप्रकरणी पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ ५० रुपयांच्या कमिशनसाठी हे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. याप्रकरणी एका ४३ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पंपाचा…

Read More