महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार:पिकनुकसानीची भरपाईही मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची माहिती
“राज्यातील कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली…