Headlines

SBI कर्मचाऱ्यांचा 25-26 मे रोजी संप:यामुळे 23 ते 27 मे पर्यंत कामकाज ठप्प होऊ शकते, 16 मागण्यांसाठी संप पुकारला

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे कर्मचारी 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसांच्या संपावर जाऊ शकतात. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन (AISBISF) ने आपल्या 16 मागण्यांसाठी या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. हा संप कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाची उत्तम परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पुकारण्यात आला आहे. SBI…

Read More

भोंदू अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ:TCS प्रकरण संघटित कटाचा भाग; तर नसरापूरच्या आरोपीचे वकीलपत्र घेणार नसल्याची वकिलांची भूमिका

नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरातला आज कडक पोलिस बंदोबस्तात राहाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, सुरक्षेच्या कारणास्तव आरसीपी तुकडीसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, आरोपीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात…

Read More

सुप्रीम कोर्टाने म्हटले- PIL आता 'पैसा इंटरेस्ट लिटिगेशन' बनली:शबरीमाला प्रकरणात वकिलांनी याचिका दाखल केली; न्यायाधीशांनी सांगितले- आपल्या लोकांसाठी काम करा

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, सार्वजनिक हिताची याचिका (जनहित याचिका) आता खासगी हित, प्रसिद्धी हित, पैशाचे हित आणि राजकीय हिताची याचिका बनली आहे. हे मत नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने केरळममधील शबरीमाला मंदिराशी संबंधित याचिकांच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले. न्यायालयाने इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनच्या २००६ च्या जनहित याचिकेच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यात केरळममधील शबरीमाला मंदिरात १० ते…

Read More

पुण्यातील पाणीकपात 31 मेपर्यंत रद्द:महापौर मंजुषा नागपुरे यांचे निर्देश, मान्सूनपूर्व पाणीपुरवठा आढावा बैठकीत निर्णय

पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार यंदा ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पुणे शहराला दररोज १५६० एमएलडी पाण्याची गरज आहे, तर धरणांमध्ये १०.२६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे….

Read More

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय:यंदापासूनच प्रवेश सुरू; श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्लाय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यास…

Read More

भांडारकर मंदिर, सीओईपी विद्यापीठात सामंजस्य करार:प्राचीन ज्ञान युवा पिढीत रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक – प्रदीप रावत

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (BORI) आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांनी भारतीय ज्ञानपरंपरा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. ही ज्ञानपरंपरा केवळ भूतकाळापुरती मर्यादित न राहता, वर्तमानात आणि तरुण पिढीच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते…

Read More

फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयावरून विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला असतानाच, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या या यशावर संशय व्यक्त केला आहे. याचवेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट…

Read More

'गिरा तो भी मेरी टांग उपर':गिरीश महाजन यांचा संजय राऊतांना खोचक टोला, विरोधकांवरही डागली टीकेची तोफ

भाजपचे संकटमोचक आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर, विशेषतः संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या परिश्रमाचा दाखला दिला. यावेळी महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, राऊतांची अवस्था ‘गिरा तो भी मेरी टांग उपर’ अशी…

Read More

एसटी बस – स्कॉर्पिओची समोरासमोर धडक:4 जण जागीच ठार, 4 जखमी; मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे येथील घटना

एसटी बस आणि स्कॉर्पिओच्या समोरासमोर झालेल्या एका धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणावर घडली आहे. या घटनेत इतर 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगारातील एक बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या…

Read More

गडचिरोलीत 'नीट' परीक्षेत हायटेक कॉपी:AI च्या मदतीने उत्तरे शोधणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा, शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावरील प्रकार

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात हायटेक कॉपीचे रॅकेट उघड झाले आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत मोबाईल पोलिस एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर सोडवणाऱ्या एका विद्यार्थिनीला पोलिस एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पकडण्यात आले आहे. याप्रप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत….

Read More