Headlines

डिलिव्हरीच्या निमित्ताने बंद घरे हेरायचा:घरफोडीप्रकरणी ब्लिंकिट कर्मचाऱ्याला अटक

सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) शाखेने एका संशयिताला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा ऑनलाइन किराणा वितरण सेवा देणाऱ्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून, कामाच्या निमित्ताने परिसरात फिरताना बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

अमरावतीत 'जरा जम के बरसो' मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले:'साहस वैदर्भी' आणि 'मैत्र जीवांचे'ने सादर केली पाऊसगाणी

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात रविवारी सायंकाळी ‘जरा जम के बरसो’ या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत ‘साहस वैदर्भी’ आणि ‘मैत्र जीवांचे’ या संस्थांनी पाऊसगाण्यांचा सुरेल नजराणा सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सभागृह श्रोत्यांनी भरले होते. आशुतोष देशपांडे, शीतल भट, केतकी मोहदरकर-देशपांडे आणि आदित्य खारोकर या गायकांनी मराठी…

Read More

औंढा नागनाथ परिसराचा होणार कायापालट:182 कोटींच्या आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा पुढाकार

देशातील आठवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. सोमवारी २२ जून रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या विकासासाठी १८२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ेय मंदिर परिसरासाठी १०६ कोटी तर पुरातत्व विभागाच्या ७६ कोटींच्या कामांचाही समावेश आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ…

Read More

Meta Invests ₹8,550 Cr in CRED; Kunal Shah to Lead WhatsApp, Will Cathcart to AI

Marathi News Business Meta Invests ₹8,550 Cr In CRED; Kunal Shah To Lead WhatsApp, Will Cathcart To AI नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने क्रेड (CRED) ॲपचे संस्थापक कुणाल शाह यांना व्हॉट्सॲपचे नवीन ग्लोबल हेड बनवले आहे. ते विल कॅथकार्ट यांची जागा घेतील, जे 7 वर्षांपासून व्हॉट्सॲपची कमान सांभाळत होते….

Read More

धारणीच्या सुसर्दा येथील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू:आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा, ऑगस्टपासून नवीन सत्र

धारणी तालुक्यातील सुसर्दा येथील शासकीय आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही संस्था केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा म्हणून कार्यरत आहे. ‘यावे प्रशिक्षणासाठी – निघावे स्वयंरोजगारासाठी’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक व्यवसायांमध्ये दर्जेदार प्रशिक्षण…

Read More

लखनऊमधील कोचिंगमध्ये ऑटोमॅटिक गेटमुळे 15 जणांचा मृत्यू:एकाच जिन्याने येण्या-जाण्याचा मार्ग; निवासी इमारतीला व्यावसायिक बनवले होते

लखनऊ कोचिंग अग्निकांडात 15 लोकांचा बळी गेला. मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते. हे लोक गेमिंग आणि ॲनिमेशन शिकण्यासाठी येत होते. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी सर्व विद्यार्थी दुपारच्या जेवणानंतर वर्गात होते. प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, इमारतीतून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता. त्याचबरोबर, कोचिंग सेंटरमधील मुख्य गेटही स्वयंचलित होते. ते अंगठ्याच्या ठशाने उघडले…

Read More

मुकुंदनगरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; गॅस सिलिंडरचे स्फोट:दोन दुकाने, घर जळून खाक; नागरिकांमुळे जीवितहानी टळली

छत्रपती संभाजीनगर येथील बाळापूर रोडवरील मुकुंदनगर भागात सोमवारी (२२ जून) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका भंगार आणि कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. शेतकरी दूध डेअरीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे दुकानातील गॅस सिलिंडरचे मोठे स्फोट झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. दुकानांच्या…

Read More

तिवसा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर:कान, नाक, घसा, दमा आणि नेत्रविकारांची तपासणी

तिवसा येथील गौरखेडेपुरा येथील आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. या शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक आणि घसा यांसारख्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या तपासणीदरम्यान मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर नेत्रदोषांविषयी माहिती देण्यात आली. काही रुग्णांची…

Read More

TMC Parallel Committee Formed; Arup Roy President; Rritabrata Bhattacharyas Challenge to Mamata Bane

Marathi News National TMC Parallel Committee Formed; Arup Roy President; Rritabrata Bhattacharyas Challenge To Mamata Bane कोलकाता5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सुरू असलेला राजकीय विद्रोह तीव्र झाला आहे. सोमवारी बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी टीएमसीच्या समांतर कार्यसमितीची घोषणा केली. आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे….

Read More

अंजनगाव बारी येथे श्री रामगीरी महाराज पुण्यतिथी महोत्सव:अखंड रामायण, षोडशी विधी आणि महाप्रसादाने सांगता

अंजनगाव बारी येथील श्री रामगीरी महाराज देवस्थान येथे परमपूज्य मठाधिपती ब्रह्मलीन रामचरणगीरी उर्फ प्रसन्नगीरी गुरू कैलासगीरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ (बरसी) तीन दिवसीय विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता अखंड रामायण पाठ, षोडशी विधी, संत-महंतांचा सन्मान आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात झाली. या महोत्सवानिमित्त १७ जूनपासून अखंड रामचरित पाठ (रामायण) वाचन, आरती आणि पूजा-अर्चा…

Read More