Headlines

अनियमित वीजपुरवठ्यामुळे काँग्रेसचा महावितरणवर मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

चांदूर रेल्वे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहर, विशेषतः छत्रपती शिवाजी नगर भागात, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय…

Read More

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यांना 72 कोटी मंजूर:आमदार राजेश वानखडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा निर्णय

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था…

Read More

वरूडमध्ये आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:भाजपच्या वतीने विशेष स्मरण कार्यक्रम; डॉ. उपेंद्र कोठीकर उपस्थित

वरूड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी २५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. सत्तेसाठी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेला तो भीषण काळ देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण…

Read More

शाहू महाराजांचे विचार अंगिकारावे:लोककलावंत प्रमोद पोकळे यांचे आवाहन, नवपिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन

लोककलावंत प्रमोद पोकळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी नवपिढीला त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श अंगिकारण्याचे आवाहन केले आहे. धर्म, संस्कृती, राष्ट्रहित आणि सामाजिक एकतेसाठी लोककल्याणकारी योजना राबवून आपले जीवन रयतेसाठी समर्पित करणारे द्रष्टे समाजसुधारक आणि आरक्षणाचे प्रणेते म्हणून शाहू महाराज ओळखले जातात. कलावंत व साहित्यिक आधार संघ, अमरावती यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना…

Read More

अमरावतीतील शाळा 30 जूनपासून सुरू:सीईओ गांधींच्या महत्त्वाच्या सूचना; गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश

अमरावती जिल्ह्यातील शाळा मंगळवार, ३० जूनपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शिक्षण विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विदर्भातील तापमानवाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील शाळा उशिरा सुरू होत आहेत. या तयारीचा आढावा घेण्यासाठी सीईओ गांधी यांनी शिक्षण…

Read More

अमरावतीचा पार्थ साबूचे सीए इंटरमीडिएट परीक्षेत यश:देशात मिळवला 37 वा क्रमांक, 'कॉस्टिंग'मध्ये 100 पैकी 100 गुण

अमरावती येथील विद्यार्थी पार्थ रोशन साबू याने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. त्याने अखिल भारतीय स्तरावर ३७ वे स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे तो अमरावती जिल्ह्यातून पहिला आला आहे. पार्थ साबूने या परीक्षेत ‘कॉस्टिंग’ या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला सुवर्णपदक…

Read More

अमरावती रुग्णालयात अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक:कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण, सुरक्षिततेबाबत जनजागृती

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) डॉक्टर्स व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलातर्फे ‘फायर डेमो’ आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्यावतीने आयोजित या विशेष प्रात्यक्षिकात कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपाययोजना आणि सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या आवाहनानुसार, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे आणि अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला….

Read More

बसस्थानकाजवळ 200 मीटर नियमाचे उल्लंघन:खाजगी वाहतूक सर्रास सुरू, परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही अमरावतीत परिस्थिती 'जैसे थे'

अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खाजगी वाहतूक सुरू असून, यामुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) मोठा आर्थिक फटका बसत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकारात संगनमत असल्याचा आरोप प्रवासी आणि जागरूक संघटनांकडून केला जात आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवाशांची पळवापळवी सुरू…

Read More

पुणे पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद:6 मोटारसायकलींसह 4.95 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखा युनिट 7 ची कारवाई

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ ने वाघोली परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ मोटारसायकली आणि ४ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोहगाव, लोणी काळभोर,…

Read More

कर्नाटकात कारमध्ये स्फोट, युवकाचा मृत्यू:सोबत बसलेल्या तरुणीला चाकू मारला, धावत्या टॅक्सीतून मारली उडी, ड्रायव्हरही जखमी

कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर कारमध्ये झालेल्या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात, तरुणाने कारमध्ये देशी बॉम्ब किंवा इतर कोणत्याही स्फोटकाचा वापर केला असावा अशी पोलिसांना शंका आहे. स्फोटाचे खरे कारण आणि कोणते स्फोटक वापरले गेले, याची पुष्टी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच होईल. मृत तरुणाची ओळख 30 वर्षीय नागेंद्र अशी झाली आहे. या घटनेत…

Read More