![]()
आगामी गणेशोत्सव, पोळा, गोकुळाष्टमी आणि ईद यांसारखे सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी वलगाव पोलीस ठाण्यात परिसरातील पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वलगाव पोलीस ठाण्याच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत गावागावांमधील कायदा व सुव्यवस्था, स्थानिक समस्या तसेच सणोत्सवाच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी पोलीस पाटलांना आवाहन केले की, गावांमध्ये घडणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचाली, वादविवाद किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या घटनांची माहिती तात्काळ वलगाव पोलीस ठाण्याला द्यावी. तसेच, पोलीस पाटलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. या बैठकीला टाकरखेडा संभू, साऊर, शिराळा, गोपाळपूर, निमखेडा, जावरा, विर्शी, खारतळेगाव, कामुंजा, कुंड, हातखेडा, कळमगव्हाण, दस्तरापूर, देवरी निपाणी, आमला, आष्टी, नांदुरा बु., सावरखेडा, वझरखेड, रामा, नारायणपूर, सुलतानपूर, थुगाव, नया अकोला, रेवसा, पूसदा, वायगाव, सालोरा बु. आणि मक्रमपूर येथील पोलीस पाटील उपस्थित होते.
Source link
वलगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक:आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यावर भर