पाचोडजवळ जांभूळ भरलेले पिकअप पलटी:रस्त्यावर पडलेल्या जांभुळांसाठी नागरिकांची झुंबड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळ वाहतूक करणारे एक पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा अपघात पाचोडजवळील मुरमा शिवारात पहाटेच्या सुमारास घडला. आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे घेऊन जाणारे हे पिकअप वाहन होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने…