भारतीय सेवानिवृत्तीसाठी आधीपेक्षा जास्त तयार:50% शहरी मुले कौटुंबिक मालमत्तेवर अवलंबून नाही; शारीरिक-मानसिक व भावनिकदृष्ट्याही तयार
गुरुग्राममध्ये राहणारे ६५ वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी महेश सलूजा यांना ऋषिकेशला जाऊन रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा होती. त्यांनी वृद्धांसाठी प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीकडून बुकिंग केले. निधीची व्यवस्था त्यांनी त्यांच्या म्युच्युअल फंडातून केली. प्रवासात तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी खास फिटनेस आणि वेलनेस प्रोग्रामही जॉइन केला. देशात निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दलची विचारसरणी वेगाने बदलत आहे. जिथे पूर्वी याला जीवनाचा…