शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा दिलासा:महाराष्ट्राला 29.5 लाख क्विंटल अतिरिक्त धान खरेदीची मंजुरी; रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट थेट 89 लाख क्विंटलवर
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने तब्बल 29.5 लाख क्विंटलने वाढवून दिले आहे. यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण धान खरेदीचे उद्दिष्ट 59.5 लाख क्विंटलवरून थेट 89 लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती…