एका कॉलमुळे हरवलेल्या वृद्धेचा तीन तासांत शोध:अमरावती मनपाच्या आधार केंद्राची कौतुकास्पद कामगिरी
अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या पथकाने हरवलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांत शोधून तिच्या घरी सुखरूप पोहोचवले. या कामगिरीमुळे आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्या बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या रहिवासी आहेत. सकाळी ९ वाजता त्या काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या…