Headlines

परिचारिका काळी फित बांधून काम करणार:दोषींवर कारवाई न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषण सुरू




अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) परिचारिकांनी एका सहकाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन पुकारले आहे. दोषींवर कारवाई न झाल्याने आज, १५ मे रोजी परिचारिका काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास १६ मे पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ६ मे रोजी एका परिचारिकेवर अन्याय झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. संबंधित परिचारिकेने कारवाई न झाल्याने संघटनेकडेही तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने परिचारिका संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. घटनेतील दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाची आगाऊ सूचना गुरुवारी, १४ मे रोजी जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांना देण्यात आली आहे. कारवाई न झाल्यामुळे परिचारिकांमध्ये असंतोष आहे. १५ मे रोजी काळ्या फिती लावून निषेध नोंदवल्यानंतरही दोषींवर कारवाई न झाल्यास, १६ मे पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *