जलतरण तलाव प्रकल्पातील भ्रष्टाचार भोवला:सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर निलंबित, क्रीडा संचालनालयाची कारवाई
सोलापूर व सातारा येथील जलतरण तलाव प्रकल्पांमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, सोलापूर आणि सातारा येथील जलतरण तलावांशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार समोर आली होती….