अमरावती व्हिडिओ प्रकरण:अयानला पायी फिरवून सिन रिक्रिएट; मोबाईल,थार कार, शस्त्रही जप्त; चौघांची कोठडी 27 एप्रिलपर्यंत वाढवली
अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अयानला पोलिसांनी बुधवारी परतवाडा येथे पायी फिरवले. थार वाहनात अयानजवळ दिसलेला मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिसांनी ‘सिन रिक्रिएट’ केले. अयानने तो मोबाईल एका मित्राला दिल्याचे सांगितले होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसलेले थार वाहन आणि पिस्टलसदृश शस्त्रही जप्त केले आहे. अयानने ज्या मित्राला…