समय रैनावर मुकेश खन्ना संतापले:म्हणाले- शक्तिमानचा अपमान केला, तुला तोंड काळे करून गाढवावर फिरवायला पाहिजे
अभिनेता मुकेश खन्ना कॉमेडियन समय रैनावर संतापले आणि बुधवारी त्यांनी एक संपादित (एडिटेड) फोटो शेअर केला, ज्यात समय रैनाला गाढवावर बसलेले दाखवले होते. त्यावर लिहिले होते की, समय रैना तू फक्त गाढवावर बसण्याच्या लायकीचा आहेस!! तेही तोंड काळं करून. त्या फोटोसोबत मुकेश खन्ना यांनी इंस्टाग्रामवर हे लिहिले, ‘कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहते. त्याला लाख बाटल्यांमध्ये ठेवा….