Headlines

21 ऑगस्टला ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर':‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा''चा देणार संदेश‎




मृद व जलसंधारणाची व्यापक जनचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंधारण विभागातर्फे २१ ऑगस्ट रोजी “महावॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण क्षेत्रातील कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट जलसंधारण दिनानिमित्त राज्यात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान “जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. तो प्रभावीपणे साजरा करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. जलसंधारणदिनानिमित्त व्यापक प्रमाणावर उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी दिली. ते म्हणाले की, महावॉकेथॉनबरोबरच माती आणि पाणी संवर्धन या विषयावर रील्स स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. यादिवशी लोगोचे अनावरण व मृद व जलसंधारणाची शपथही घेतली जाणार आहे. संपूर्ण अभियान कालावधीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वादविवाद स्पर्धा आणि ‘एक शाळा – एक शोषखड्डा’ आदी उपक्रम राबवून पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचेही मस्कर यांनी सांगितले. क्रिकेट क्लब मैदानापासून सुरूवात : “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानापासून सुरू होऊन एसटी बसस्थानक, अशोक वाटिका चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टॉवर चौक ते पुन्हा क्रिकेट क्लब मैदान असा ठरवण्यात आलेला आहे. अधिकाधिक अकोलेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *