Headlines

Manisha Kayande Targets Sanjay Raut Over Eknath Shinde Criticism


संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस संपूर्ण भारतात दिसला नाही. ज्या माणसाने कोणती वार्डात निवडणूक लढवली नाही, उमेदवारी अर्ज दाखल कसे करतात ते माहिती नाही, प्रचार करण्याची वेळ कधी आली नाही. ते एकनाथ शिंदेंच्या जीवावर खासदार झाले आहेत आणि आम्हालाच शिवीगा

.

मनिषा कायंदे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाचे काय कर्तव्य आहेत हे राऊतांना माहिती आहे का? निवडणूक आयोगाने इतिहासात उत्तम निर्णय घेतल्याचे आपण पाहिले आहे. तुमच्या बाजूने निर्णय घेतला तर यंत्रणा चांगली आणि विरोधात गेला की सर्वांना शिव्या देत सुटायचे हे अगदी चुकीचे आहे. एखादा वेडा माणूस रोज सकाळी उठून लोकांना शिव्या देतो त्यांची आणि राऊतांची तुलना करता येऊ शकते.

शिंदेंसोबत लाखो शिवसैनिक

मनिषा कायंदे म्हणाल्या की,जे कधीही सिद्ध करता येत नाही ते संजय राऊत बोलत असतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी एका महिन्यात सरकार कोसळेल असे ते म्हणाले होते. सहा महिन्यात जाणार असे होणार असेच म्हणत होते पण काही झाले नाही. राहुल नार्वेकर यांच्यासमोर आम्ही बहुमत सिद्ध केले. लोकांनी निवडून दिलेले लोकं आमदार, खासदार, नगरसेवक होत असतात, लाखो शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत. कपिल सिब्बल यांनी केलेला सर्व युक्तिवाद हा भावनिक होता, याच कागदोपत्री तथ्य कुठे होते.

सिब्बलांना पगार मिळाला म्हणून ते बोलतात

मनिषा कायंदे म्हणाल्या की, विधानसभेतील काही मुद्दा असेल तर त्याचा निर्णय तिथेच होत असतो. कपिल सिब्बल यांना पगार मिळाला आहे म्हणून ते बोलत आहेत. ते त्यांचे काम आहे ते करत राहतील पण कोर्ट पुराव्यावर चालते. राऊत रोज सकाळी उठून यांनी पैसे खाल्ले त्यांनी पैसे खाल्ले म्हणतात ते बोलणं खूप सोपं आहे, पण सिद्ध काहीच केले जात नाही.

अंधारेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

मनिषा कायंदे म्हणाल्या की, कोर्ट काय निर्णय देईल हे सांगता येत नाही अजून आमचा युक्तिवाद सुरूच झालेला नाही. केवळ उगाठाचा युक्तिवाद सुरू आहे, त्यापूर्वीच ही लोकं काय होणार हे सांगूण मोकळे होत आहे. या सर्वांचा अभ्यास कच्चा आहे. एकनाथ शिंदे बैठकीला का उपस्थित नव्हते हे मला ताहिती नाही. सुषमा अंधारे यांच्यासारखा देवांना नाव ठेवणारी माणसं उद्धव ठाकरेंना चालतात. याच अंधारेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली होती. लोकांच्या अंगावर जाण्यासाठी कोणी तरी हवे म्हणून ठाकरेंना त्या हव्या आहेत, पण त्यांना गांभीर्याने घेणं गरजेचे नाही.

हे ही वृत्त वाचा केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही:अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून निवडणूक आयोगाने शेण खाल्लं– संजय राऊत

अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले इथेच निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, त्यांनी आमचा बाजू कधीच ऐकूण घेतली नाही. या सर्व गोष्टीचे निर्माते अमित शहा हे आहेत, ते आता तोंड लपवून पळत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामाध्यमातून देशाची प्रतिमा उंचवण्याचे काम करत असते. केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.