![]()
कोंढवा परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत मोहम्मद उस्मान कामील खान (वय 19, रा. मीठानगर, कोंढवा) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनाही टोळक्याने मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद खान आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी कोंढव्यातील मीठानगर भागात राहतात. किरकोळ कारणावरून त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. घटनेच्या वेळी खान आणि त्याचे दोन मित्र कोंढव्यातील पारगेनगर चौकातून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी मोहम्मद खान याच्यावर शस्त्राने वार केले. त्याच्या मित्रांना मारहाण केली आणि खानच्या डोक्यात दगड घालून तेथून पळ काढला. या प्रकरणी मोहम्मद खान याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आम्ही फुरसुंगीचे भाई म्हणत डिलिव्हरी बॉयला मारहाण दरम्यान,दुसऱ्या घटनेत हडपसरमधील फुरसुंगी येथे डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून २१ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सचिन वसंतराव सावंत (वय 39, रा. खंडोबा माळ, फुरसुंगी) असे जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 13 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सावंत हे फुरसुंगीतील पॉवर हाऊस चौकातून दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी स्वतःला ‘फुरसुंगीचा भाई’ असल्याचे सांगत सावंत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी सावंत यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली आणि त्यांच्या खिशातील 17 हजार 500 रुपये रोख काढून घेतले. त्यानंतर त्यांना धमकावून ऑनलाइन पद्धतीने 4200 रुपये जमा करण्यास सांगितले. सावंत यांचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, खुनाचा प्रयत्न:कोंढव्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू