Headlines

विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी खा. धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे मागणी:अकोला-ढोण दुहेरीकरण, चार सुपरफास्ट ट्रेनची मागणी‎




विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही प्रदेशांतील रेल्वे सुविधांचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळवून देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रलंबित मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. खासदार धोत्रे यांनी विशेषतः अकोला जिल्हा आणि परिसरातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी ठोस मागण्या लावून धरल्या आहेत. यामध्ये अकोला-ढोण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम तातडीने सुरू करणे, तसेच अकोला-पूर्णा खंड आणि पूर्णा बायपासशी संबंधित प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचा समावेश आहे. याशिवाय, हैदराबाद-अजमेर (ट्रेन क्र. १७६०५/१७६०६) चा अतिरिक्त वेळ कमी करून तिचे वेळापत्रक सुधारणे किंवा तिला सुपरफास्ट दर्जा देणे, तसेच हैदराबाद-गोरखपूर (ट्रेन क्र. ०७०७५/०७०७६) ही गाडी पूर्णा-अकोला मार्गावरून नियमितपणे चालवण्याची मागणी त्यांनी केली. संपूर्ण क्षेत्राचा विचार करता, नांदेड-श्री गंगानगर ट्रेन दररोज केल्यास हिंगोली, वाशीम आणि अकोला परिसराला सुरत-अहमदाबादसाठी थेट रोजची ट्रेन उपलब्ध होईल. तसेच नांदेड-जम्मू तवी हमसफर एक्स्प्रेसचा विस्तार श्री माता वैष्णो देवी कटरापर्यंत करून ती दररोज चालवावी, हिंगोली मार्गे चार नवीन सुपरफास्ट ट्रेन सुरू कराव्यात आणि अमरावती-तिरुपती ट्रेन दररोज करावी, अशा प्रमुख मागण्याही त्यांनी लावून धरल्या. या सर्व रेल्वे गाड्या व मार्गांमुळे अकोला आणि परिसरातील धार्मिक यात्रांना सुलभता मिळेल, तसेच व्यापारी व औद्योगिक उपक्रमांना मोठी चालना मिळून क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. अकोल्यासाठी खासदार धोत्रे यांच्या मुख्य मागण्या अकोला-ढोण मार्ग दुहेरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे. पूर्णा बायपाससह प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत. ट्रेन क्रमांक १७६०५/१७६०६ (हैदराबाद-अजमेर)चे वेळापत्रक तर्कसंगत करून सुपरफास्ट दर्जा द्यावा. ट्रेन क्रमांक ०७०७५/०७०७६ (हैदराबाद-गोरखपूर) पूर्णा-अकोला मार्गावरून नियमित चालवावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *