![]()
आज समाजात सर्व स्तरांवर तरुण महिलांवर वाढत असलेल्या विविध दबावांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान, प्रतिष्ठा, संतुलनासह स्त्रीत्व समजून घेण्याची व ते स्वीकारण्याची खरी गरज आहे. स्त्रीने खऱ्या अर्थाने ताठ मानेने जगून तिचे स्त्रीत्व जपले पाहिजे. त्यामुळे समाजाने या संकल्पनेचा स्वीकार करून स्त्रीत्वाला सन्मान द्यावा, असे आवाहन गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले. नवयुवती व विद्यार्थिनींच्या विकासासंदर्भात विविध उपक्रम राबवणाऱ्या गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीने १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय स्तरावर ‘स्त्रीत्व स्वीकार’ हे अभियान राबवले जात आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत या अभियानाची माहिती देण्यात आली. यावेळी शाखा अध्यक्ष आसेमा शेख, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अयमान शादाब, महाराष्ट्र उत्तर-२ च्या कॅम्पस सचिव सफिया शेख, माध्यम सचिव मोनिसा शेख, जमात-ए-इस्लामी हिंदच्या महिला शाखा अध्यक्षा सरवत सलमा सहाबा आणि मोहीम समन्वयक फायका समिन आदी नवयुवती पदाधिकारी उपस्थित होत्या. ‘इम्ब्रासिंग फेमिनिटी’ अर्थात स्त्रीत्वाचा स्वीकार ही संकल्पना मानवी निसर्गाच्या उपजत स्वभावातून प्रेरणा घेते. एका बाजूला असलेली सांस्कृतिक बंधने व दुसऱ्या बाजूला सतत कार्यक्षम राहण्याचा दबाव व भावनिक अलिप्तता, या दोन्ही टोकांच्या पलीकडे जाऊन हे अभियान ‘तिसरा मार्ग’ मांडत आहे. स्त्रीत्व ही कमजोरी किंवा मर्यादा नसून मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. महिला जेव्हा आपले स्त्रीत्व न दडपता योगदान देतात, तेव्हा संपूर्ण समाज अधिक समृद्ध होतो, असे मत व्यक्त करण्यात आले. विविध उपक्रमांचे आयोजन: शहरात गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीने या अभियानांतर्गत अनेक रचनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांमध्ये महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Source link
समाजाने ‘स्त्रीत्वाचा स्वीकार' या संकल्पनेची कास धरावी:गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशनचे आवाहन; 31