![]()
अकोला ते अकोट महामार्गावरील दहीहांडा फाटा ते गोपाळखेड बायपास मार्गावर सत्संग सोहळ्यासाठी जाणाऱ्या एका खासगी प्रवासी वाहनाला अपघात झाला. वाहनाचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याखाली उतरून थेट शेतात उलटले. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अकोला येथे आयोजित सत्संग सोहळ्यासाठी हे वाहन चार ते पाच प्रवाशांना घेऊन जात होते. दहीहांडा फाटा- दहीहांडा बायपास मार्गावरील वळणावर अचानक स्टिअरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला. काही क्षणांतच वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यावरून घसरत शेतात गेले आणि उलटले. कठड्यांचा प्रश्न ऐरणीवर अपघातामुळे दहीहांडा फाटा – गोपाळखेड बायपास मार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोकादायक वळणावर आवश्यक सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. “आज वाहन शेतात जाऊन थांबले म्हणून मोठा अनर्थ टळला, पण प्रशासन अपघात घडल्यानंतरच जागे होणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
Source link
सत्संग सोहळ्यास जाताना गाडी उलटली:जिवितहानी नाही; स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले