Headlines

‘नशामुक्त' कावड पालखी उत्सवाचा शिवभक्तांचा संकल्प:ऐतिहासिक परंपरेची ‘गिनीज बुक''मध्ये नोंद करण्याची एसपींची इच्छा‎




जिल्ह्यातील ऐतिहासिक व वैभवशाली कावड पालखी उत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व कावड, पालखी व शिवभक्त मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा कावड उत्सव पूर्णपणे ‘नशामुक्त’ वातावरणात साजरा करण्याचा ऐतिहासिक व कौतुकास्पद संकल्प केला आहे. प्रास्ताविक उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले व सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक ढोले यांनी गांधीग्राम येथील कावड उत्सवाच्या अनुषंगाने सद्यस्थितीचा आढावा मांडला. बैठकीदरम्यान शिवभक्त मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनाशी संवाद साधून वाहतूक व्यवस्था आणि इतर समस्यांवर तोडगा निश्चित केला. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत, विघ्न आणणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्याचा इशारा दिला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अकोल्याच्या समृद्ध कावड परंपरेचे कौतुक केले. या ऐतिहासिक उत्सवाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा राखावा आणि कोणतीही अडचण आल्यास पोलिस मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन केले. बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघण यांनी आभार मानले. शिवभक्त व कावड पालखी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत स्वतःहून नशामुक्त उत्सवाचा संकल्प केला. शिवभक्तांच्या या पुढाकाराचे पोलिस प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. सर्व मंडळांनी शिस्त, शांतता आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिले. उत्सवासाठी शिवभक्तांचा पुढाकार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *