![]()
येत्या चार वर्षांत जगभरात १७ कोटी नव्या नोकऱ्यांची संधी निर्माण होणार आहे. मात्र, त्याच वेळी ऑटोमेशन आणि एआयमुळे सव्वा नऊ कोटी पारंपरिक रोजगार संपतील. हा जागतिक बदल लक्षात घेत राज्य शासनाने ‘जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण २०२६’ जाहीर केले आहे. भारताने करार केलेल्या २८ देशांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना अधिकृत नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय परिषदेत जर्मनी, जपान, फ्रान्स, रशिया व ब्रिटनचे वाणिज्य दूत तसेच भरती संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुणांची होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक थांबवण्यासाठी शासन थेट सुरक्षित भरती यंत्रणा उभारत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी राज्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम जागतिक दर्जानुसार बदलला जाईल. तसेच ‘डिजिटल इंडिया भाषिणी’च्या माध्यमातून तरुणांना परदेशी भाषांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “परदेशातील नोकरीसाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही. तिथल्या स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षणही दिले जाईलतरुण तिथे राज्याचे सदिच्छा दूत म्हणून काम करतील.” या धोरणाचे मोठे दूरगामी परिणाम ब्रेन ड्रेन नव्हे, ‘टॅलेंट सर्क्युलेशन’ : तरुण कायमचे परदेशात जाण्याऐवजी तिथे काही वर्षे प्रगत तंत्रज्ञान शिकतील आणि पुन्हा राज्यात परत येऊन स्थानिक उद्योगांना बळ देतील. रोजगार महाकुंभात ७१,९३९ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार मुंबई | राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास मंत्रालयाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’मध्ये कंपन्या आणि उद्योगसंस्थांचा प्रतिसाद मिळाला असून १,५८८ नियोक्त्यांच्या माध्यमातून ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध हाेणार आहे. पात्रता आणि कौशल्ये असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येणार आहेत. फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांसाठीही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. आयटीआय, पदवी, बारवी, डिप्लोमा, इंजिनीअरिंग आणि इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांवर संधी उपलब्ध आहेत. टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ट्रेनी, अप्रेंटिस, सेल्स, ग्राहक सेवा आणि इतर पदांचा यामध्ये समावेश आहे. काय आहे ‘ग्लोबल वर्कफोर्स मोबिलिटी’?
Source link
28 देशांतील संधींसाठी महाराष्ट्रातील तरुणांना ‘स्किल पासपोर्ट’ मिळणार:महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी सीएमकडून घोषणा