Headlines

Maharashtra Pakshimitra Awards 2026 Invite Applications


पक्षी संवर्धन, संशोधन, उपचार आणि जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ तर्फे 2026 च्या वार्षिक पुरस्कारांसाठी अधिकृत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. सन 2019 पासून सुरू झालेल्या

.

वार्षिक संमेलनात प्रदान करण्यात येणाऱ्या या विविध पुरस्कारांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • स्व. रमेश लाडखेडकर स्मृती ‘महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार – 2026’:पक्षिमित्र चळवळीत दीर्घकाळ कार्यरत राहून अधिवास व पक्षी संवर्धनासाठी कार्य केलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
  • स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती ‘महाराष्ट्र पक्षी संशोधन पुरस्कार – 2026’:पक्षी अभ्यास, संशोधन, पीएचडी कार्य, संशोधन निबंध, प्रकाशित साहित्य किंवा अहवाल यांद्वारे संवर्धनाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
  • नामदेवराव बहादुरे पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार – 2026:(प्रायोजक: अनिल बहादुरे, नागपूर) पक्षी व अधिवास संवर्धन तसेच जखमी पक्ष्यांवर उपचार व सुश्रुषा करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
  • रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती ‘महाराष्ट्र पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार – 2026’:पक्षी अभ्यास आणि जनजागृतीच्या माध्यमातून संवर्धनाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येईल.
  • स्व. प्रकाशसिंह नारायणसिंह मोरे स्मृती ‘पक्षिमित्र पत्रकारिता पुरस्कार – 2026’:पक्षीविषयक जनजागृती, संवर्धन व संशोधनपर सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या नियमित पत्रकारास हा दर एक वर्षाआड दिला जाणारा पुरस्कार प्रदान केला जाईल.
  • श्रीमती सुशीला पाटकर स्मृती ‘महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी साहित्य पुरस्कार – 2026’:पक्षीविषयक साहित्याद्वारे ज्ञानाचा प्रसार व जनजागृती करणाऱ्या लेखकाच्या प्रकाशित साहित्याला हा पुरस्कार दिला जाईल.

नियम आणि अटी:

जीवन गौरव पुरस्कार वगळता इतर सर्व पुरस्कार आवश्यकतेनुसार विभागून दिले जाऊ शकतात. प्रस्तावांची निवड करताना ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’चे सभासदत्व, संमेलनातील सहभाग आणि चळवळीतील योगदानाला प्राधान्य दिले जाईल. तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीचे सदस्य किंवा त्यांचे कुटुंबीय या पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

अर्ज कसा करावा?

पुरस्कारांसाठी स्वतः किंवा इतर व्यक्ती/संस्थेमार्फत अर्ज सादर करता येईल. संपूर्ण भरलेला आणि स्कॅन केलेला प्रस्ताव PDF स्वरूपात pakshimitra@gmail.com या ईमेलवर पाठवता येईल. अथवा टपालाने पाठवण्यासाठीचा पत्ता:

कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र

द्वारा प्रा. डॉ. गजानन वाघ,

63, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड,

व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती – 444604

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 ही आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडक पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली जातील. अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती संस्थेच्या www.pakshimitra.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रचे किशोर गठडी यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *