![]()
फुलंब्री बोरगाव अर्ज येथून साईभक्तांच्या शिर्डी पायी दिंडीचे गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. गेल्या १६ वर्षांची परंपरा जपत बोरगाव अर्ज येथील तरुणांनी यंदाही या पायी वारीचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता स्थानिक साई मंदिरात साईबाबांचे भावपूर्ण पूजन व महाआरती करून दिंडीचा शुभारंभ झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘साईनाथ महाराज की जय’च्या जयघोषात गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. गावातील श्री गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन दिंडी शिर्डीच्या मार्गाने मार्गस्थ झाली. यंदाच्या दिंडीत ५० हून अधिक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. ही पायी दिंडी २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शिर्डी येथे पोहोचेल. ही पायी दिंडी एकूण ६ मुक्कामांनंतर शिर्डीत दाखल होणार आहे. पहिला मुक्काम येसगाव, दुसरा कसाब खेडा, तिसरा गाराज, चौथा खंडाळा, पाचवा धोत्रे आणि सहावा मुक्काम शिर्डी येथे असणार आहे. प्रस्थान सोहळ्याप्रसंगी गावकऱ्यांनी दिंडीतील पदयात्रिकांचे दर्शन घेऊन निरोप दिला. बोरगाव अर्ज येथून शिर्डीकडे पायी जाणाऱ्या दिंडीचे गुरुवारी प्रस्थान करण्यात आले.
Source link
50 युवकांचा सहभाग:बोरगाव अर्ज येथून शिर्डी पायी दिंडीचे उत्साहात झाले प्रस्थान, 29 जुलै रोजी शिर्डीला पोहोचणार