Headlines

65 एकर शेतीचा मालक निघाला लुटारू;संभाजीनगरात महिलांना गंडवणारा अटकेत:कर्ज, नोकरीचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेत दागिने पळवायचा



एकट्या राहणाऱ्या, वृद्ध महिलांना कर्ज-नोकरीचे आमिष दाखवून निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या नागोराव सुखदेव श्रीरामे (३०, मूळ रा. हनकदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली. सध्या रा. एसटी कॉलनी, सुरेवाडी) याला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ गुन्ह्यांती

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागोराव याच्या वडिलांची गावी ६५ एकर शेती आहे. तो अविवाहित आहे. आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला. तो १५ ते १७ जूनदरम्यान शहरात आला होता. एसटी कॉलनीत घरमालकाला ‘माझा व्यवसाय आहे,’ असे सांगून तो भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता.

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपीवर हिंगोली, बाळापुरात लूटमारीसह ७ गुन्हे दाखल आहेत. एका वृद्ध महिलेचा खून करून चांदी लुटल्याच्या प्रकरणातही तो आरोपी होता, मात्र नंतर तो पुराव्याअभावी सुटला. २०२२-२३ मधील कोल्हापूर येथील पेपरफुटी प्रकरणातही आपण असल्याचे त्याने सांगितले आहे. हिंगोली पोलिसांनी त्याच्यावर ‘एमपीडीए’ कारवाई केली होती. २०२३ पर्यंत तो शहरात ‘प्रहार’ नावाने पोलिस भरती प्रशिक्षण अकादमी चालवत होता व तेथेही त्याने विद्यार्थ्यांची फसवणूक केली.

आंबेडकर चौकातून केली अटक

आरोपी एसटी कॉलनी भागात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांना मिळाली. त्यावरून एएसआय सुभाष शेवाळे व त्यांच्या पथकाने जाधववाडी परिसरात पायी फिरून शोध घेतला. सुमारे एक तासानंतर तो १६ एकरांच्या मैदानाच्या परिसरात दुचाकीवर दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. पुढे दुचाकी सोडून रिक्षात बसून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून आंबेडकर चौकात त्याला ताब्यात घेतले.

विश्वास संपादन करून गंडवण्याचा वेगळा फंडा

आरोपी कपड्यांच्या दुकानातून किंवा इतर माध्यमातून महिलांचे नंबर मिळवायचा. त्यांच्याशी संवाद वाढवून, चहा-नाश्त्याला नेऊन तो विश्वास संपादन करायचा. सिडकोत एका महिलेला दुकानासाठी २ लाख कर्जाचे आमिष दाखवले. तिला तिसगाव शिवारात नेऊन जिवे मारण्याची धमकी देत ४ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे गंठण व १ तोळ्याचा नेकलेस काढून घेतला. त्याचबरोबर एका महिलेला ‘मुलाला नोकरी लावतो,’ असे सांगून अयोध्यानगर-कर्णपुरा भागात नेले. तेथे चाकूच्या धाकावर सोन्याचे रिंग लुटले. यापूर्वीही त्याने अनेक महिलांचे १-२ ग्रॅम सोने लुटले आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने महिला तक्रार करत नसत. चोरीतून मिळालेला पैसा तो इतर महिलांवर आणि फिरण्यावर खर्च करत असे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *