Headlines

आळंदीत घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार:नामांकित महाराज शाम महाराज राठोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल




घरात घुसून जबरदस्तीने महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली. याप्रकरणी नामांकित महाराज शाम महाराज राठोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी घुसखोर महाराज यांची यादी जाहीर केली होती त्यात शाम महाराज राठोड यांचे नाव होते. पीडित महिलेने २४ एप्रिल २०२६ रोजी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ७ एप्रिल रोजी आरोपी पीडितेच्या घरात आले. त्यांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढुन घेतले. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, पीडितेला शिवीगाळ केली. हे तुझे घर आमच्या नावावर कर नाहीतर, ते घर विकून आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला असाच त्रास देत राहु, अशी धमकीही दिली. दरम्यान, या घटनेच्या चार- पाच महिन्यांपूर्वी आरोपी हे पीडित महिलेच्या घरी आले होते. त्यावेळीही त्यांनी जबरदस्तीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, पीडित महिलेने खाण्यासाठी केलेल्या भाताच्या पातेल्यात संशयिताने लघुशंका केली. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी आरोपी पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेले. त्यावेळी पीडित महिलेने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आरोपींनी शिवीगाळ केली. तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकी दिली. तसेच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला, असे पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *