Headlines

Uterine rental racket on social media offering Rs 8 lakhs, deal made through chatting, calls


सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते ८ लाखांचे आमिष दाखवून त्यांचे

.

पेमेंट पद्धत : गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज केले जातात

गर्भधारणेवेळी १० टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके निश्चित झाल्यावर १०% तर पुढील ५ महिने ५० टक्के रक्कम विभागून दरमहा दिली जाते. उर्वरित ३० टक्के रक्कम प्रसूतीनंतर दिली जाते. याचे कुठलेही कागदोपत्री पुरावे नसतात.

सरकारी रुग्णालयांची संमती आवश्यक

कायद्यामुळे तरी आता बंधने आली आहेत. पूर्वी तर अवैध सरोगसी सर्रास होत असे. नियमानुसार आयव्हीएफ सेंटर्सने सरकारी रुग्णालयांची संमती घेणे बंधनकारक आहे. शिवाय गर्भधारणा होऊ शकत नाही हे सिद्ध करावे लागते. एकदाच सरोगसी करता येते. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय व रुग्णालय, संभाजीनगर

आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग कॉल करतात

इंडिया सरोगसी-इनटेडेंट पॅरेंट अँड सरोगेट ग्रुप, एग्ज डोनेशन अँड सरोगसी ग्रुप इन इंडिया, सरोगसी इन इंडिया, सरोगसी, एग्ज डोनेशन अँड स्पर्म डोनेशन इन द यूएसए, स्पर्म डोनेशन इंडिया, डू यू नीड सरोगसी मदर, स्पर्म डोनेशन पुणे, स्पर्म डोनेशन कोलकाता, स्पर्म डोनेशन बेंगळुरू, सरोगेट मदर इन इंडिया, हेल्प मी फाइंड सरोगसी असे २५ पेक्षा अधिक ग्रुप आहेत. आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, मग कॉल करतात.

कायद्यानुसार १० वर्षांचा तुरुंगवास

सरोगसी (नियमन) कायदा- २०२१ चे कलम ३८ व ३९ नुसार सरोगेटला मोबदला म्हणून पैसे देणे बेकायदा आहे. जर कुणी व्यक्ती, आयव्हीएफ सेंटर असा व्यवसाय करत असेल आणि सरोगसीतून जन्मलेल्या अपत्यांची विक्री करत असेल तर कायद्यानुसार १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय १० लाखांपर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो.

निशा शर्मा: सरोगेट एकटीच हवी प्रतिनिधी : पैसे किती मिळू शकतील? दलाल : सरोगेटच्या प्रोफाइलवर रेट ठरत असतो. आधीच सांगत नसतात. प्रतिनिधी : मला १० लाख हवेत. दलाल : ५ ते ८ लाखच मिळतील. सरोगेटला बेंगळुरूला आमच्या घरी राहावे लागेल. खर्च आम्ही करू. प्रतिनिधी: मी पत्नीसोबत राहू शकतो का? दलाल : अजिबात राहता येत नाही. सरोगसीनंतर मातेला कर्नाटकमधील उडपी शहरात प्रसूतीपर्यंत ठेवले जते. प्रतिनिधी : ॲडव्हान्स मिळेल का? दलाल : नाही, आम्ही रेल्वे तिकीट काढून देतो किंवा खर्च भरून देतो.

वंदना राव: प्रसूतीपर्यंत थांबावे दलाल : तुमच्याकडे सरोगेट मदर आहे का? वय किती आहे? प्रतिनिधी : हो आहे, २८ वय आहे. पैसे किती मिळतील ते सांगा. दलाल : ६ लाख देऊ. प्रोफाइल पाहिल्यावर त्यात वाढ होऊ शकते. प्रतिनिधी : मला १० लाखांचे कर्ज फेडायचे आहे. तेवढी रक्कम द्या. दलाल : एवढे नाही मिळू शकणार. जास्तीत जास्त ७ लाख मिळतील. प्रतिनिधी : सरोगसीची प्रक्रिया महाराष्ट्रात होईल की बाहेर राज्यात? दलाल: नाही, बेंगळुरूला यावे लागेल. प्रसूती होईपर्यंत येथेच थांबणे अनिवार्य.

सरोगसीची वैध पद्धत : १. मूल होत नसलेल्या जवळच्या नातेवाइकांनाच सरोगेट मदर करता येते. २. सरोगेटसोबत कायदेशीर करार केला जातो. आई-वडिलांचे शुक्राणू काढून सरोगेटच्या गर्भाशयात सोडतात. ३. प्रसूती झाल्यावर मूल दिले जाते. पण तत्पूर्वी सरोगेटचा ३६ महिन्यांचा वैद्यकीय विमा काढतात. ४. गर्भधारणेदरम्यानचा पौष्टिक आहार आणि प्रवासाचा खर्च दिला जातो. ५. सरोगसी पैसे कमावयचे साधन नाही. असे करणाऱ्यांना कलम ४० नुसार ५ वर्षे शिक्षा, ५ लाखांचा दंड होतो.

सरोगसीची अवैध पद्धत :

१. गरजूंना घेरून आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. रिक्वेस्ट स्वीकारल्यावर मेसेंजरवर कॉल करतात. २. सरोगसीला तयार असलेल्यांची सोशल मीडियाच्या विविध अकाउंटवरून अनेकदा उलटतपासणी केली जाते. ३. स्त्रीबीज देणार की सरोगसी करणार हे कॉल करून विचारतात. पूर्ण प्रोसेसही समजावून सांगतात. ४. वय, रक्तगट, उंची, वजन, मासिक धर्माची माहिती फोटोसह अपलोड करायला लावतात. ५. बेंगळुरू, हैदराबाद, कोलकात्याला बोलावून आरोग्य तपासणी होते. मग प्रसूतीपर्यंत उडपी शहरात ठेवतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *