![]()
“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि
.
केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे जगणे नेमकेपणाने मांडले. त्यांची “कॉमन मॅन’ ही रचना सामान्य मध्यमवर्गीयांची रोजची जगण्याची धडपड आणि त्यांच्या चाकोरीबद्ध मानसिकतेवर अचूक बोट ठेवून गेली. तर दुसरीकडे, “नया युगातील एकलव्य’ या विडंबनपर काव्यातून त्यांनी आजच्या व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेवर थेट प्रहार केला. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, विद्यार्थ्यांमधील जीवघेणी स्पर्धा आणि या चक्रात भरडली जाणारी तरुण पिढी याबद्दलची त्यांची तीव्र चिंता या रचनेतून उपस्थितांना विचार करायला लावून गेली. त्यांनी आपल्या सादरीकरणात शॉपिंग, भाषा, संध्याकाळ, जनरेशन गॅप आणि मैफील अशा विविध संवेदनशील विषयांना स्पर्श करत नगरकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. याच कार्यक्रमात “हॉबी क्लब’चे समन्वयक आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे यांचा वाचनालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी केले, सत्कार शिल्पा रसाळ यांनी केला, तर आभार राहुल तांबोळी मानले. या काव्य मैफिलीला चांगला प्रतिसाद मिळाला.
वारीच्या सुरांवर सभागृहात रंगला ठेका! अनघा तांबोळी यांच्या “पंढरपूरची वारी’ या काव्य गायनाने मैफिलीत भक्तीभावाचा एक वेगळाच रंग भरला. कवयित्रीच्या सुरांमध्ये उपस्थित रसिकांनीही आपला सूर मिसळवला आणि संपूर्ण वाचनालयाच्या सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा आणि गीतांचा ठेका धरत या रचनेला उत्स्फूर्त दाद दिली.