![]()
सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पाण्याचा उपसा बंद करण्याची मागणी केली आहे.
Source link
केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती