![]()
वेरूळ | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग व खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमीर जेतपूरवाला, शिवालय प्रतिष्ठान वेरूळचे सुनील लोखंडे, सतीश फुलारे, गोविंद काकडे, निखिल आव्हाड, सनी शिंदे व सचिन सुदाम उपस्थित होते. श्री घृष्णेश्वर मंदिरात पोहोचल्यावर धीरज शर्मा यांचे शिवालय प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा केली. त्यानंतर खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
Source link
राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी घेतले श्री घृष्णेश्वराचे दर्शन:खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात जाऊन दर्शन