Headlines

एस.टी. महामंडळात नोकरभरतीची मोठी संधी!:तब्बल ३३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त; चालक-वाहकांच्या जागांचाही समावेश




महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक परिवहन महामंडळात (एस.टी.) ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ग-१ ते वर्ग-४ प्रवर्गामध्ये एकूण ३३,०५१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहे. ईटीआयएम मशीन्स, ओआरएस प्रणाली आणि प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावरील अनेक पदे तात्पुरती गोठवण्यात आली असली, तरी प्रवासी सेवेशी संबंधित रिक्त पदांमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. महामंडळाच्या श्रेणीनिहाय रिक्त पदांचा विचार करता, अत्यंत महत्त्वाच्या वरिष्ठ पदांचा समावेश असलेल्या वर्ग-१ प्रवर्गात २९ पदे रिक्त आहेत. आगार व्यवस्थापक (डेपो मॅनेजर), विभागीय वाहतूक अधिकारी आणि लेखा अधिकारी समाविष्ट असलेल्या वर्ग-२ प्रवर्गातील १८२ पदे रिक्त आहेत. लिपिक, चालक-वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या वर्ग-३ या सर्वात मोठ्या प्रवर्गात २५,८२६ पदे रिक्त आहेत, तर सहायक, सुरक्षारक्षक आणि सफाईगार अशा वर्ग-४ प्रवर्गात ७,०१४ पदे रिक्त आहेत. एस.टी.चा कणा असलेल्या चालक प्रवर्गात २५,७२१ मंजूर पदांपैकी २०,३२९ कर्मचारी कार्यरत असून ५,३९२ पदे रिक्त आहेत. वाहक प्रवर्गात २४,८९४ पैकी २२,४०१ कर्मचारी कार्यरत असून ३,४९३ पदे रिक्त आहेत; तर सध्या १३,८३३ कर्मचारी ‘चालक तथा वाहक’ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय गाड्यांच्या देखभालीशी संबंधित ‘कारागीर क’ श्रेणीत ३,६६१ पदे रिक्त आहेत. डिजिटल प्रणालीमुळे लिपिक संवर्गातील ७७७ पदे आणि प्रादेशिक कार्यालये बंद झाल्याने सुरक्षारक्षकांची १,८३२ पदे तात्पुरती गोठवण्यात आली आहेत. प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ही रिक्त पदे भरणे महामंडळासमोर मोठे आव्हान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *