![]()
नीट २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अखेर संस्थेकडून निलंबित करण्यात आले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सोमवारी एका आपत्कालीन बैठकीत हा म
.
प्राध्यापिका मांढरे या गेल्या २४ वर्षांपासून मॉडर्न महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांची नियुक्ती नीट परीक्षेच्या गोपनीय कामासाठी केली होती.
संस्थेने स्पष्ट केले आहे की, या नियुक्तीचा महाविद्यालयाशी किंवा संस्थेशी कोणताही संबंध नव्हता. मांढरे आणि एनटीए यांच्यातील सर्व पत्रव्यवहार थेट सुरू होता.
शनिवार, १६ मे २०२६ रोजी मनीषा मांढरे यांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेला अत्यंत गंभीर आणि निंदनीय मानत संस्थेच्या नियामक मंडळाने सोमवारी तातडीची बैठक बोलावली.
या बैठकीत महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील नियम ३३ (५) नुसार त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. हे निलंबन त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच १६ मे २०२६ पासून लागू करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबत शिक्षण आयुक्त कार्यालय, शालेय शिक्षण विभाग आणि सहसंचालक कार्यालयाला अधिकृतपणे कळवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी आता सीबीआयच्या सहकार्याने करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा…
नीट पेपरफुटी प्रकरण- मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी:राउज एव्हेन्यू कोर्टासमोर केले होते हजर, NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती
NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला CBI ने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. जिथे कोर्टाने बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. पुण्यातील बायोलॉजी लेक्चरर मनीषा गुरुनाथला दिल्लीतील CBI मुख्यालयात चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. एजन्सीचा दावा आहे की मांढरे NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती. सविस्तर वाचा…