![]()
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील पाच वर्षांत काही रासायनिक खतांच्या दरात ४० टक्के वाढ झालेली असून, शेतमालास मिळणारा भाव ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे
.
गेल्या पाच वर्षांत डीएपी, युरिया, एनपीके, पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. शेतीमालाचे भाव मर्यादित आहेत. खतांचे दर मात्र दरवर्षी वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संभाजीनगर जिल्ह्यासाठी खरीप हंगामात एकूण ३,९५,४४९ मे. टन खतांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २,९२,७०० मे. टन खतसाठ्यास मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच मागणीच्या तुलनेत १,०२,७४९ मे. टन कमी मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खरीप हंगामात खतपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या जिल्ह्यात १,२३,९२८ मे. टन खतसाठा शिल्लक उपलब्ध असल्याची माहिती आहे. खतांच्या किमती वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाचे दर, आयात, वाहतूक खर्च आणि अनुदान धोरणातील बदल ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. मात्र या सगळ्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाला हमीभाव किंवा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या चक्रात अडकत चालला आहे. सोयाबीन, मका, कापूस या पिकांना योग्य भाव नाही. मात्र, खत, औषधे, मजुरी सगळे महाग झाले आहे. शेती करायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. दरवर्षी खतांचे भाव वाढतात. आमच्या मालाचा भाव मात्र तसाच राहतो. सरकारने खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी शेतकरी इद्रिस शहा यांनी केली आहे. ^ खतसाठा उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खरेदी करावी. केंद्र चालकांनी खत विक्रीनंतर ई-पॉस मशीनमधून खत विक्री केलेल्या शेतकऱ्याच्या नावाने कमी करावा. लिंकिंग करू नये. – दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कच्च्या मालामुळे खतांची
गरजेनुसार खरेदी करावी
दर नियंत्रणात ठेवणे गरजेचे