Headlines

घोळसगावचा रस्ता वर्षभरात करणार, शनैश्वर दर्शन भक्तांसाठी होईल सुकर:गुणवंत विद्यार्थी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नूतन सदस्यांचा सन्मान‎




सर्वधर्मीय जागृत शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान घोळसगाव येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविक भक्तांना अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. येत्या शनी अमावास्या यात्रेपर्यंत घोळसगाव ते बोळेगाव शिवपर्यंत आणि घोळसगाव ते किरनल्ली रस्त्यापासून श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थानपर्यंत पक्का मजबूत रस्ता तसेच आमदार निधीतून येथे सभागृहांचे बांधकाम करण्याचे आश्वासन उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी दिले. जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संत हवा मल्लिनाथ महाराज यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थांचा आणि अक्कलकोट, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करण्यात आले. या प्रसंगी उपसभापती सागर कल्याणशेट्टी बोलत होते. प्रथम राष्ट्रगीत म्हणून संविधानाची शपथ घेऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आले. या वेळी कलबुर्गीचे उद्योगपती शहाजीराव पाटील, अॅड. वैजनाथ झळकी, मंजुनाथ बिराजदार, बसवराज धरणे, आनंद तानवडे, सरपंच मेलगीरी, अमोल हिप्परगी यांच्या प्रमुख उपस्थित होते. श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष अप्पासाहेब किवडे यांनी प्रस्तावना केले. वैजनाथ वर्दे यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र काळे यांनी मानले. गीतातून चिमुकल्या मुलीकडून मतदानाबाबत जागर, भाविकांचीही मोठी गर्दी पैसे घेऊन मतदान केल्यास देश विकल्यासारखे होईल म्हणून मतदान करताना कोणीही पैसे घेऊ नका, असे साक्षी व प्रीती या लहान मुलीने गायिलेले देशभक्ती गीतास तसेच कर्नाटकातील सुप्रसिद्ध पारिजात भजना गायिका प्रभावती किरणगी यांच्या अध्यात्मिक आणि देशभक्ती गायनास श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिले. बोलो भारत माता की जय, वंदे मातरम्, श्री शनैश्वर मल्लिनाथ महाराज की जयचा जयघोष करीत हजारो भाविक भक्तांनी श्री शनैश्वर आणि राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तानी अलोट गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या सुमारे दहा हजारांहून अधिक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व श्रीचे दर्शन घेऊन जल्लोष साजरा केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *