Headlines

मनीषा वाघमारेनेच नीट पेपरफुटीच्या रॅकेटसाठी मनीषा मांढरेला अचूक हेरले:पुण्यातील सोसायटीत एकत्रच वास्तव्य; दोघींमध्ये होता कौटुंबिक एकोपा



देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील ब्यूटी पार्लर चालक महिला मनीषा वाघमारे व मॉर्डन महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक करण्यात आली. योगायोग म्हणजे या दोघी या कात्रज परिसरातील गंगाओशन या सोस

.

प्राप्त माहितीनुसार मनीषा मांढरे ही संबंधित सोसायटीत एकटीच वास्तव्यास होती. या ठिकाणी सन २०१२ मध्ये तिने फ्लॅट विकत घेतला. ती गेल्या २४ वर्षापासून मॉडर्न महाविद्यालयात रसायनशास्त्र प्राध्यापिका म्हणून काम पाहत आहे. तसेच गेल्या सहा वर्षांपासून एनटीएमध्ये नीट परीक्षा पेपर ठरवण्यातही तिची भूमिका होती.

मुलगी बीडीएसला; पतीचे आहे डेंटल क्लिनिक

मनीषा वाघमारेची मुलगी बीडीएस करते, बिबवेवाडी परिसरात वाघमारेचे ब्यूटी पार्लर असून तिचे पती संजय वाघमारे यांचे डेंटिस्ट क्लिनिकही या ठिकाणीच आहे. तर, दोन वर्षांपूर्वी वाघमारेच्या मुलीनेही नीट परीक्षा दिली असून सध्या ती बीडीएसचे (डेंटिस्ट) शिक्षण घेत आहे. मुलीच्या नीट परीक्षेच्या निमित्ताने वाघमारेने मांढरेशी मागील तीन ते चार वर्षांपासून जवळीक वाढवत त्यांच्या घरी ये-जा सुरू केली होती.

काही विद्यार्थ्यांची घरी ‘शिकवणी’

विशेष म्हणजे मांढरे काही विद्यार्थ्यांची घरी शिकवणी घेत होती. त्याचाच वापर करून वाघमारेने सोशल मीडियावर नीट परीक्षा समुपदेशक नावाने काही निवडक परीक्षार्थींना एकत्र केले. मांढरेच्या राहत्या घरी ठराविक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेतले गेल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या क्लासमध्येच त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले व पुस्तकात खुणा करून दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *