![]()
गेल्या दोन दिवसांत लागू झालेल्या इंधन दरवाढीचा थेट फटका नेवासा तालुक्यातील घोडेगाव आणि परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे. दरवाढीपाठोपाठ सुरू झालेल्या तीव्र डिझेल टंचाईमुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीची मशागत पूर्णपणे खोळंबली असून शेतकरी दुहेरी
.
रविवारी (१७ मे) डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ लागू झाली. मात्र, पंपांवर साठा उपलब्ध असतानाही नवीन दरांचे “सेटिंग’ करण्याच्या नावाखाली अनेक पेट्रोल पंप रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पंप सुरू होताच काही तासांतच डिझेल संपल्याने वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लावले. सोमवारी (१८ मे) दुपारनंतर परिसरातील केवळ एकाच पंपावर डिझेल उपलब्ध झाल्याने शेतकरी आणि वाहनधारकांनी डिझेल खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंगळवारीही सकाळी डिझेल आले, पण ते घेण्यासाठी पंपांवर रांगा लागल्या होत्या.
सध्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असून, पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. पारंपरिक पद्धतीने बैलांद्वारे मशागत करणे आता शेतकऱ्यांना आर्थिक व व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. मात्र, ऐन गरजेच्या वेळी पंपांवर डिझेलच मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालक हतबल झाले आहेत. डिझेलअभावी ट्रॅक्टर उभे असल्याने शेतातील नांगरणी, रोटर आणि मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पेरण्या लांबण्याची आणि शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मशागतीचे दर १० टक्क्यांनी वधारले इंधन दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर झाला आहे. डिझेल महागल्याने वाहतूक भाड्यात वाढ झाली आहेच, सोबतीला शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. ट्रॅक्टर चालकांनी मशागतीच्या दरात साधारण १० टक्के दरवाढ केली. पूर्वी एकरी नांगरणीसाठी १८०० रुपये लागायचे आता यात वाढ होऊन ते २ हजारांपर्यंत गेले. तर शेती साहित्य किंवा इतर वाहतुकीसाठी पूर्वी घोडेगाव ते सोनई ३०० रुपये घेतले जायचे. त्यात ५० रुपये वाढ झाली.