Headlines

लग्नकार्यातील विलंबामुळे फोटोग्राफर पुरते वैतागले:शेवगावातील बैठकीत फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम वाया जात असल्याने खंत‎‎



लग्नसमारंभ, हळदी आणि इतर मंगल प्रसंगांमध्ये आयोजकांकडून होणाऱ्या अक्षम्य विलंबामुळे फोटोग्राफी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शेवगाव येथील बैठकीत तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बदलत्या काळातील आव्हाने

.

सकाळी बोलावून कार्यक्रम दुपारी सुरू होणे किंवा सायंकाळी बोलावून रात्री उशिरापर्यंत लांबणे, यामुळे फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

समाजाने आमच्या वेळेचा आदर करावा ^”आम्ही फक्त फोटो काढत नाही, तर लोकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण जपतो. मात्र कार्यक्रमांच्या वेळा पाळल्या न गेल्याने तासनतास ताटकळत राहावे लागते. याचा परिणाम आमच्या आरोग्यावर आणि कौटुंबिक आयुष्यावर होतो. महागाईमुळे आधुनिक साहित्य खरेदी करणे कठीण झाले असले, तरी आम्ही उत्तम सेवा देतो. समाजानेही आमच्या श्रमाचा व वेळेचा आदर करावा.” -राम नाईक, फोटोग्राफर, शेवगाव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *