.

आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे २५ जून रोजी पुण्याहून सुरू होईल. अमरावतीकर प्रवाशांनाही या पर्यटन ट्रेनमधून जगन्नाथ पुरी, कामाख्या देवी यासारख्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. कारण, ही ट्रेन बडनेरा स्टेशनवरही थांबा घेणार आहे. त्यामुळे या ट्रेनने यात्रेला जाण्यासोबतच परतही येता येणार आहे.
प्रवाशांना त्यांच्या सुविधेनुसार किफायती स्लीपर, स्टँडर्ड थर्ड एसी आणि कम्फर्ट सेकंड एसी श्रेणीतून प्रवास करता येईल. सुमारे ७५० प्रवासी क्षमता असलेली ही ट्रेन पुण्यापासून नागपूरपर्यंत विविध प्रमुख स्टेशनवर चढण्यासह उतरण्याची सुविधा प्रदान करणार आहे. यात पुणे- लोणावळा- कर्जत- प नवेल- कल्याण- नाशिक रोड- मनमाड- चाळीसगांव जं.- भुसावळ- अकोला- बडन ेरा- वर्धा- नागपूरसह विविध स्टेशनचा समावेश असल्याची माहिती आयआरसीटीसी पश्चिम क्षेत्राचे गट महाव्यवस्थापक गौरव झा, प्रवक्ते डॉ. ए.के.सिंह यांनी दिली.
क्लास (स्लीपर) : २२७७० रु. स्टँडर्ड क्लास थर्ड एसी : ३९६२० रु. कम्फर्ट क्लास सेकंड एसी: ५२८६० रु.
ही विशेष एसी, नॉन एसी पर्यटन ट्रेन प्रवाशांना संपूर्ण देशाची सुविधाजनक यात्रा करवेल. तसेच आध्यात्मिक व सांस्कृतिक ठेवा बघण्याची संधी प्रदान करेल. ट्रेनमध्ये प्रवाशांचे आरोग्य व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले