Headlines

अनुकूल अहवालासाठी 1.5 लाखांची लाच; जिल्हा उपनिबंधकाला अटक:जळगावात रक्कम स्वीकारताना मध्यस्थासही अटक, मागितले होते 3 लाख



‘तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला, म्हणून आमचे खूप मोठे नुकसान झाले. म्हणूनच मी नकारात्मक अहवाल दिला होता. आता पैसे द्या, तुमच्या बाजूने अनुकूल अहवाल पाठवतो,’ अशी धक्कादायक अट घालत चक्क ५ लाख रुपयांची लाच मागणारे जळगावचे उपनिबंधक जगदीश बाब

.

तडजोडीअंती ठरलेल्या ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांचा खासगी मध्यस्थाला बुधवारी (२० मे) एसीबीच्या पथकाने अटक केली. देविदास धनसिंग पाटील ( ४४, रा. जळगाव) असे या मध्यस्थाचे नाव आहे.

कार्यालयाबाहेर मध्यस्थामार्फत स्वीकारली रक्कम

बारी यांनी लाचेची रक्कम मध्यस्थ देविदास पाटील याच्याकडे देण्यास सांगितले होते. देविदास पाटील हा जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचा मानद कार्यकारी अधिकारी आहे. बुधवारी बी.जे. मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून दीड लाखांची लाच स्वीकारताच एसीबीने पाटील याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *