Headlines

शिवन्यात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; रस्त्याच्या कडेलाच टाकतात कचरा:कचरामुक्तीच्या केवळ घोषणा, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎



स्वच्छ भारत अभियान (टप्पा दोन) अंतर्गत गाव हागणदारीमुक्त व कचरामुक्त करण्याच्या वल्गना एकीकडे शासन पातळीवर केल्या जात असताना, प्रत्यक्षात सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधून प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला

.

ग्रामपंचायत आवारात साचलेला कचरा, गल्लोगल्ली तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, तुटलेले ढापे आणि नळाला येणारे अशुद्ध पाणी यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्वतःच्या दारातील कचरा ग्रामपंचायत उचलू शकत नाही, तर संपूर्ण गाव काय स्वच्छ ठेवणार? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या घाणीमुळे डास आणि माश्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, अबालवृद्ध आजारी पडत आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लाखोंचा निधी दिला जातो. घंटागाडी, कचराकुंड्या, विलगीकरण शेड यासाठी पैसे येतात. तरीही शिवनातील चित्र विपरीत आहे. जागोजागी पडलेला घाणीचा खच ग्रामपंचायतच्या कारभाराचे वाभाडे काढत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने नागरिक चिंतेत असल्याची स्थिती आहे.

स्वच्छतेबाबत सफाई कर्मचाऱ्यांना सूचना Ãपावसाळ्यापूर्वीच्या कामांचे नियोजन करण्यात आले असून, जागोजागी पडलेली घाण व कचरा तातडीने उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. – रवींद्र गंगावणे, ग्रामपंचायत अधिकारी, शिवना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *